PostImage

Vaingangavarta19

Yesterday   

PostImage

लिटिल हर्ट्स विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा


लिटिल हर्ट्स विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
 
आष्टी :- चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथील लिटिल हर्टस इंग्लिश मिडीयम हायस्कूल येथे दि. २८ ते ३० जानेवारी २०२५ रोजी तीन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन समारोह आयोजित करण्यात आला. त्यानिमित्त कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साईराम बहुद्देशीय शिक्षण संस्था सिरोंचा चे अध्यक्ष श्री. अनिल आल्लुरवार तर कार्यक्रमाचे उद्घाटक आष्टी पोलीस स्टेशन चे ठाणेदार श्री. विशाल काळे साहेब तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मा. सौ. बेबीताई बुरांडे, सरपंच ग्रामपंचायत आष्टी, मा. रविंद्र ओल्लालवार माजी अध्यक्ष जिल्हा परिषद गडचिरोली, मा. रमेश आरे सचिव, साईराम बहुद्देशीय शिक्षण संस्था सिरोंचा, मा. कृष्णमुर्ती गादे मुख्याध्यापक लिटील हर्टस इंग्लिश मिडीयम हायस्कूल आष्टी  यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
    कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांकडून लेझीम पथक व परेडद्वारे पाहुण्यांना पाचारण केले. त्यानंतर पाहुण्यांच्या हस्ते महात्म्यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. त्यानंतर आलेल्या पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.
कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत मुख्याध्यापक श्री. कृष्णामूर्ती गादे यांनी विद्यालयात होणाऱ्या विविध उपक्रमाविषयी उपस्थितांना माहिती दिली. दरवर्षी विद्यालयातील विद्यार्थी नवोदय विद्यालय, शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र होतात. दरवर्षी शाळेचा दहावीचा निकाल १०० टक्के असून मागील वर्षी दहावीतून शिवम पोलोजीवार हा विद्यार्थी आष्टी केंद्रातून प्रथम आला. तसेच गोळाफेक या स्पर्धेत इयत्ता आठवीतील तन्मय फुलझेले हा विद्यार्थी शारीरिक शिक्षक नितेश पुंगाटी यांच्या मार्गदर्शनाखाली विभागस्तरावर गडचिरोली जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले. तसेच जिल्हास्तरावर विविध खेळात विद्यालयातील विद्यार्थी प्राविण्य पटकाविले. असे बोलून या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवून सहकार्य केल्याबद्दल सर्व पालकवर्गाचे आभार मानले.
यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक मा. विशाल काळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना प्रथमत: लेझीम व परेड द्वारे केलेल्या पाहुण्यांच्या स्वागताविषयी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक जीवनात अभ्यासाबरोबर खेळ व सांस्कृतिक कार्यक्रमाची तितकीच आवश्यकता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या उज्वल भविष्याकरिता मेहनत करणे आवश्यक आहे. 
तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. अनिल आल्लूरवार यांनी अध्यक्षीय भाषणात म्हटले की, विद्यालयाद्वारे आयोजित तीन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन उत्साह विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना प्रोत्साहन मिळावे व त्यांना मिळणाऱ्या पारितोषिकच्या रुपाने आवडत्या क्षेत्राची निवड त्याविषयी जिद्द व चिकाटी निर्माण व्हावी या हेतूने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
विद्यालयात आयोजित करण्यात आलेला तीन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन समारोह म्हणजे विद्यार्थ्यांना त्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांची वाढ व्हावी, आणि त्यांच्या असलेल्या विविध गुणांना वाव मिळावा, स्टेज डेअरिंग निर्माण होऊन विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने जगता यावे तसेच शालेय जीवनात आवश्यक मूलभूत बाबी च्या माध्यमातून व विविध उपक्रमातून विद्यार्थ्यांना सामाजिक क्षेत्रात आपले स्थान निश्चित करता यावे यासाठी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी मंचावर साईराम बहुद्देशीय शिक्षण संस्था सिरोंचा चे अध्यक्ष श्री. अनिल आल्लुरवार, आष्टी पोलीस स्टेशन चे ठाणेदार श्री. विशाल काळे साहेब तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मा. सौ. बेबीताई बुरांडे, सरपंच ग्रामपंचायत आष्टी, मा. रविंद्र ओल्लालवार माजी अध्यक्ष जिल्हा परिषद गडचिरोली, मा. दिलीप बारसागडे केंद्र प्रमुख आष्टी,  मा. रमेश आरे सचिव, साईराम बहुद्देशीय शिक्षण संस्था सिरोंचा, संस्थेच्या सहसचिव सौ. दिपा आल्लूरवार, सदस्या सौ. भवानी निलम, सौ. सरिता गादे, तसेच शिक्षक पालक समितीचे उपाध्यक्ष श्री. रविंद्र पाल, सदस्या सौ. सपना पांडे, सदस्य श्री. जितेंद्र निमसरकार, म.ज्यो. फुले महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. श्याम कोरडे, श्री. कपिल मसराम, शारी. शिक्षक सावित्रीबाई फुले विद्यालय आष्टी, कु. श्वेता कोवे राष्ट्रीय धनुर्विद्या खेडाळू, श्री. कृष्णमुर्ती गादे मुख्याध्यापक लिटील हर्टस इंग्लिश मिडीयम हायस्कूल आष्टी, श्री. प्रमथ मंडल मुख्याध्यापक शिशु मंदिर पब्लिक स्कूल आष्टी, डॉ. ओ. पी. सिंग प्राध्यापक महिला महाविद्यालय आष्टी, डॉ. पी. के. सिंग सद्गुरू साईबाबा विज्ञान महाविद्यालय आष्टी, श्री. शरद कोदेट्टीवार, श्री. अनिल बोमकंटीवार, श्री. गणेश सिंगाडे पत्रकार आष्टी, तसेच पालकवर्ग, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


PostImage

Vaingangavarta19

Yesterday   

PostImage

आता भोग आपल्या कर्माची फळे,महिला पोलीस शिपाई यांचे केले पोलीस …


 

आता भोग आपल्या कर्माची फळे,महिला पोलीस शिपाई यांचे केले पोलीस निरीक्षक यांनी विनयभंग

 

 

यवतमाळ:- दारव्हा पोलिस स्टेशनमध्ये एक घटना समोर आली असून, एका महिला पोलिस कॉन्स्टेबलची छेड काढणाऱ्या ठाणेदाराच्या रायटर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण पोलिस दलात खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, दारव्हा पोलिस स्टेशन येथे कार्यरत एका महिला कॉन्स्टेबलची पोलिस स्टेशन मधिलच ठाणेदाराच्या रायटर ने छेड काढल्याची घटना घडली आहे. पोलिस कर्मचारी सुरेश काशिराम राठोड हा त्याच ठाण्यात कार्यरत आहे. गेल्या काही दिवसांपासून तो पीडित महिलेला वारंवार त्रास देत होता. त्याने अश्लील शेरेबाजी, विनयभंगासारखी कृत्ये केली आणि पीडितेच्या इच्छेविरुद्ध वर्तन केले, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. पीडित महिलेने प्रथम सहकाऱ्यांना व वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही बाब सांगितली. मात्र, आरोपीने आपल्या वर्तनात कोणताही बदल केला नाही. त्यामुळे अखेर तिने थेट कायदेशीर कारवाईसाठी पुढाकार घेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. महिला पोलिस कॉन्स्टेबलच्या तक्रारीवरून आरोपी पोलिस कर्मचाऱ्याविरुद्ध कलम ३५४ (महिलेला विनयभंग करण्याचा प्रयत्न), ५०९ (महिलेला अपमानित करणारे कृत्य किंवा शब्द), अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी सुरू केली असून, आरोपीला तडकाफडकी निलंबित करण्याची शक्यता आहे. तसेच, विभागीय चौकशी सुरू असून, पुढील काही दिवसांत आरोपीवर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.या घटनेमुळे पोलिस दलात संतापाची लाट उसळली आहे. महिलांच्या सुरक्षेचे रक्षण करणाऱ्या यंत्रणेतच अशा घटना घडत असतील तर इतरांचे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या आधी सुद्धा या पोलिस कर्मचार्यावर याच दारव्हा पोलिस स्टेशनमध्ये महिला कॉन्स्टेबलची छेड काढल्या प्रकरणी गुन्हा दाखल असुन या आधी सुद्धा पोलिस स्टेशनमधील अनेक महिला कर्मचार्यांना मानसिक त्रास देत असुन बदनामी व दबाव पोटी कोणी तक्रार केली नसल्याचे कळते. तालुक्यासह शहरातील अवैध धंद्याच्या वसुलीतही हा पोलिस कर्मचारी माहिर आहे. वरिष्ठांकडून या प्रकरणी काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.


PostImage

Vaingangavarta19

Yesterday   

PostImage

पंचायत समिती माजी सभापती यांची केली नक्षलवाद्यांनी हत्या


पंचायत समिती माजी सभापती  यांची केली नक्षलवाद्यांनी हत्या 

 

 

भामरागड;- तालुक्यात नक्षल्यानी पंचायत समिती माजी सभापती याची हत्या केल्याची घटना उघडीस आली आहे, सदर पंचायत समिती माजी सभापती सुखराम मडावी ह्याची हत्या कियेर या गावात झाली असून हत्या केल्या नंतर नक्षल्यानी पत्रके देखील टाकले आहे. त्या पत्रकात नक्षल्यानी उल्लेख केला आहे

(सदर हे लिखाण नक्षली पत्रकाचे असून यात काही बदल केले गेले नाही)

जन दोही और पार्टी द्रोही सुखराम मडाडी (माजी सभापत्ती) जिला गड़चिरोली, तहासील भामरागढ़, केयेर, गांव निवासी को पीएलजीए मौत को सजा दिया !

जन द्रोही सुखराम मडावी भामरागढ़, डोडाराज, और गड़चिरोली जिला, पोलिस प्रसशान के सांठ घांठ होकर लाखों पैसों का लालच में फसकर मुखबीर काम कर रहा था!

नेलगुंड़ा, कउंड़े, पेनगुंड़ा, आलदंडी, पोयोरकोटी, मीडंगुरवेचा, ऐसे कैयों गांव के हमारा जन संगठन कार्यकर्ताओं को पकड़वना जेल ठूंसने का कारण सुखराम मडावी का हाथ हैं!

और सुखराम मड़ावी ग्राम सभा पेसा कानून का विरोध में पेनगुंड़ा गांव में नया पोलिस कैंप बैंठने का और अलग-अगल खदान कोलने के लिए जनता का लाखों करोड़ सम्पत्ती को घरानों कारपोरेट कंपनीयों को सोंपवना, इस कारण से जन द्रोही सुखराम मड़ावी को पीएलजीए ने मौत का सजा दिया गया!और कुछ लोग भी सुखराम से मिल कर दुश्मन से सांठ घांठ होकर लाखों पैसा के लालच में फसकर जन द्रोही मुखबीर काम कर रहा है। और पोलिस कैंप, खदान कोलने में भी हाथ हैं। ऐसे गलत काम नही चोंड़ने से उनको भी सुखराम जैसा सजा दिया जाएगा

माजी पंचायत समिती सभापती सुखराम मडावी ह्याची हत्या १

फेब्रुवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास नक्षल्यानी गावालगत असलेल्या क्रिकेट ग्राउंड जवळ बेदम मारहाण करून केली. कियेर हे गाव कोठी मदतकेंद्राअंतर्गत येते


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Feb. 1, 2025   

PostImage

मोदी सरकारची नक्षलवाद्यावर सर्जिकल स्ट्राइक.....8 नक्षली ठार


रायपूर:

छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त बिजापूर जिल्ह्यात शनिवारी मोठी चकमक झडली आहे. विजापूरच्या तोडका भागात सुरू असलेल्या चकमकीत आतापर्यंत 8 नक्षलवादी ठार झाले आहेत. ठार झालेल्या सर्व नक्षलवाद्यांचे मृतदेह जवानांनी ताब्यात घेतले आहेत. अजूनही चकमक सुरूच असल्याचं सांगण्यात येत आहे. छत्तीसगडमधील ही गेल्या काही दिवसातील मोठी कारवाई आहे. या कारवाईत आतापर्यंत 8 नक्षली ठार झाले आहेत. त्यांचा हा आकडा वाढण्याची दाट शक्यता आहे.  

 

 

तोडका परिसर हा विजापूर जिल्ह्यातील गांगलूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो. जिथे ही चकमक सुरू आहे. ठार झालेल्या नक्षलवाद्यांकडून अनेक स्वयंचलित शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. शिवाय आठ नक्षलवाद्यांचे मृतदेही जवानांनी ताब्यात घेतले आहेत. या हल्लावेळी नक्षलवाद्यांनी अधुनिक शस्त्रांच्या सहाय्याने जवानांवर हल्ला केला होती. ही शस्त्रेही आता ताब्यात घेण्यात आली आहेत. 

 

 

 

ही चकमक अजूनही सुरू असल्याची माहिती मिळत आहे. गेल्या काही महिन्यातील ही जवानांची नक्षलवाद्यां विरोधातील मोठी कारवाई आहे. छत्तीसगडमध्ये नक्षली कारवायाही वाढल्या होत्या. त्यानंतर जवानांनी त्यांना पायबंद घालण्यात यश मिळवलं होतं. काही नक्षलींनी गेल्या काही दिवसात आत्मसमर्पण ही केलं आहे. ज्यांनी केले नाही त्यांना जवानांनी यमसदनी धाडलं आहे. दरम्यान या कारवाईत आणखी नक्षली ठार झाले असावेत असा अंदाज आहे. 


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Jan. 31, 2025   

PostImage

मनापासून दारू सोडायची इच्छा आहे त्यांनी हे काम करा


ज्यांना मनापासून दारू सोडायची इच्छा आहे त्यांनी दारू प्यावीशी वाटते त्या वेळेस दोन-तीन कागदी लिंबाचा केवळ रस, साखर, पाणी किंवा मीठ न मिसळता प्यावा. मग खुशाल दारू प्यावयास घ्यावी. बहुधा दारू घशाखाली उतरत नाही. कारण दारू व आंबट लिंबू रस यांचा परस्परविरोध आहे. ज्यांना असे करावयाचे नाही त्यांच्या घरातील स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तींनी या दारुड्या माणसाच्या जेवणात कोशिंबीर, चटणी, रायते, भाज्यांत सायट्रिक अ‍ॅसिड किंवा लिंबूक्षार नावाचे साखरेच्या कणासारखे केमिकल मिसळतात, ते चार-पाच कण टाकावेत. ते फार आंबट असतात. त्याची किंमत नाममात्र असते. कोणत्याही केमिस्टकडे किंवा आयुर्वेदीय औषधी उत्पादकांकडे मिळतात. मी विनामूल्य देतो.

 

 

तूप खा आणि या रोगांना दूर ठेवा

भूक लागत नाही, पचन होत नाही म्हणून सबब सांगून जे मद्यापान करू इच्छितात त्यांना कुमारीआसव, द्राक्षारिष्ट, पिप्ललादि काढा, पंचकोलासव असे काढे करून पहावे. फायदा निश्चित होतो. जी मंडळी झोपेकरिता किंवा चिंता दूर व्हावी म्हणून किंवा दु:ख विसरण्याकरिता मद्यप्राशन करू इच्छितात त्यांनी शतधौत घृत झोपण्यापूर्वी कानशिले, कपाळ, तळहात, तळपाय यांना जिरवावे; नाकात दोन थेंब टाकावेत. स्वत:च्या प्रश्नाव्यतिरिक्त कोणताही विषय किंवा वर्तमानपत्रातील बातमी डोळ्यांसमोर आणावी, चटकन झोप लागते. गरज पडली तर निद्राकर वटी सहा गोळ्या झोपताना घ्याव्यात. शांत झोपेकरिता आणखी दोन उपाय म्हणजे सायंकाळी लवकर व कमी जेवण घ्यावे. जेवणानंतर किमान वीस ते तीस मिनिटे फिरून यावे.

 

‘एकच प्याला’ नाटक लिहिणारे महान मराठी साहित्यिक श्रीराम गणेश गडकरी, महात्मा गांधी, संत विनोबा, संत गाडगेमहाराज यांना प्रणाम!


PostImage

Vaingangavarta19

Jan. 31, 2025   

PostImage

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कंत्राटी कामगारांचे आर्थिक शोषण – काम बंद …


शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कंत्राटी कामगारांचे आर्थिक शोषण – काम बंद आंदोलनाची तयारी


“मे. स्मार्ट सर्विसेस प्रायवेट लिमिटेड” कंपनीला ठेका मिळाल्यापासून कामगारांच्या पगार आणि पीएफमध्ये ( PF ) गडबड कायम….


चंद्रपूर  :- चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कंत्राटी कामगारांना “मे. स्मार्ट सर्विसेस प्रायवेट लिमिटेड” या कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर आर्थिक शोषणाचा सामना करावा लागत आहे. कंपनीला ठेका मिळाल्यापासून कामगारांच्या पगार आणि पीएफमध्ये गडबड सुरू असून, जुन्या स्थायी कामगारांना कमी करण्याच्या धमक्याही दिल्या जात आहेत.
कंपनीने सुरुवातीला काही सुपरवायझर पाठवले होते, ज्यांनी जुन्या कामगारांना कमी करण्यासाठी तडजोड केली आणि नवीन कामगारांची भरती करण्यासाठी 50,000 ते 1 लाख रुपयांची मागणी केली होती. या धोरणामुळे जुन्या कामगारांना कामावरून कमी करण्यात आले. शिक्षणाच्या अपुऱ्या अटी, डॉक्युमेंट्सची अपूर्णता, वयाची अट अशा कारणांसह त्यांना काढून टाकले जात होते. काही कामगारांनी या अन्यायाविरोधात आवाज उठवला, त्यानंतर थोडा दबाव आल्यानंतर जुन्या कामगारांना त्यांच्या स्थानावर ठेवण्यात आले, मात्र कंपनीने मोठ्या प्रमाणावर नवीन कामगारांची भरती केली, ज्यामुळे कंपनीचे नफा वाढले.

परंतु आता, कंपनी कंत्राटी कामगारांना पगार देण्यास सक्षम नाही. अनेक कामगारांना मागील तीन ते चार महिन्यांपासून पगार नाही मिळाल्याचे समोर आले आहे. मागील महिन्यात काही कामगारांना केवळ 7,000 ते 15,000 रुपयांच्या भेदभावात्मक पगाराची रक्कम मिळाली, यामुळे आर्थिक अडचणी वाढल्या आहेत.

तसेच, पीएफमध्ये देखील गंभीर भेदभाव दिसून येत आहे. काही कामगारांचे पीएफ 400 रुपयांपर्यंत आहे, तर काहींचे 4000 रुपयांपर्यंत जमा झाले आहेत, ज्यामुळे कामगारांचा हक्क व मेहनतीचे योग्य मोबदला मिळवण्याचे अधिकार संकटात आले आहेत.

या सर्व समस्यांवर शासकीय अधिकारी गप्प का आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. चंद्रपूरातील कंत्राटी कामगारांची समस्या आता संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय बनली आहे. सरकार आणि संबंधित अधिकारी यावर त्वरित कारवाई करतील का? यावरच कामगारांचे भवितव्य अवलंबून आहे.

कामगारांचा संघर्ष आता एक पाऊल पुढे जाऊन काम बंद आंदोलनच्या रूपात उभा आहे. हे आंदोलन अधिक तीव्र होण्याच्या तयारीत आहे. सरकार आणि संबंधित अधिकाऱ्यांनी यावर लवकर कारवाई न केली, तर कंत्राटी कामगारांना त्यांच्या हक्कांसाठी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरावे लागेल.

चंद्रपूरमधील कंत्राटी कामगारांचा संघर्ष आता आणखी गंभीर होतोय. काम बंद आंदोलनाच्या इशाऱ्यावर सरकारने योग्य कारवाई केली नाही, तर परिस्थिती आणखी ताणली जाऊ शक


PostImage

Vaingangavarta19

Jan. 31, 2025   

PostImage

अवैध गौण खनिज उत्खनन रोखण्यासाठी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे कडक …


अवैध गौण खनिज उत्खनन रोखण्यासाठी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे कडक कारवाईचे आदेश

 


अवैध वाहतूक आढळल्यास तात्काळ कारवाई आणि वाहन जप्तीचे आदेश

संयुक्त पथकाचे गठण

अनुपस्थित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई

दररोज अहवाल सादर करणे बंधनकारक.

गडचिरोली दि. 31: जिल्ह्यातील अवैध गौण खनिज

उत्खननामुळे शासनाच्या महसुलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान, पर्यावरणाची हानी आणि गुन्हेगारी वाढत असल्याचे निदर्शनास आल्याने त्यावर आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी जिल्ह्यात विविध ठिकाणी स्थायी चेकपोस्ट आणि कडक उपाययोजना तातडीने अंमलात आणण्याचे निर्देश एका आदेशान्वये आज यंत्रणेला दिले आहेत.

यानुसार जिल्ह्यातील सर्व महसूल उपविभागांमध्ये स्थायी चेकपोस्ट (FRB कॅबीन) स्थापन करून ते त्वरित कार्यान्वित करण्याचे आणि या चेकपोस्टवर मंडळ अधिकारी यांना नियंत्रण अधिकारी आणि नायब तहसीलदार यांना नोडल अधिकारी म्हणून8:51 PM | 2.8KB/s

234

जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

चेकपोस्टवर दररोज 24 तास (24×7) कर्मचारी आणि पोलिस तैनात करण्याचे आदेश असून, महसूल उपविभागीय अधिकाऱ्यांनी यासाठी स्वतंत्र आदेश काढावेत व प्रत्येक वाहनाची ईटीपी तपासणी करून त्याची वैधता निश्चित करण्यासही निर्देश दिले आहेत.

गौण खनिज वाहतूक तपासणी आणि कारवाई*

अवैध उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी नियुक्त केलेल्या पथकांनी प्रत्येक वाहनाची ईटिपी (इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिट पास) तपासून ती वैध आहे का, याची खात्री करावी. नियमबाह्य उत्खनन अथवा वाहतूक आढळल्यास, वाहन ताब्यात घेऊन कायदेशीर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश आहेत.

या मोहिमेअंतर्गत महसूल, पोलिस आणि मंडळ अधिकारी यांचे संयुक्त पथक गठीत करून अवैध उत्खनन व वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. संबंधित अधिकाऱ्यांनी दररोज केलेल्या कारवाईचा अहवाल त्यासबधाचा माहिता जिल्हाधिकारा कायालयात गुगल शिटवर अद्ययावत करायचे आहेत.

चेकपोस्टवर कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी नियमावली*

सर्व नियुक्त अधिकारी आणि कर्मचारी यांना दिलेल्या ठिकाणी वेळेवर उपस्थित राहणे बंधनकारक आहे. कोणीही विनापरवानगी अनुपस्थित राहिल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल.

तसेच, वाहन चालक किंवा मालकाकडून गैरवर्तन आढळल्यास भारतीय दंड संहितेच्या कलम 221 अंतर्गत संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कारवाईसाठी जप्त केलेली वाहने संबंधित तहसील कार्यालय किंवा पोलिस ठाण्यात पुढील आदेशापर्यंत ताब्यात ठेवण्याचे निर्देश आहेत.

जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार संयुक्त पथकाने आपसी सहकार्याने जिल्ह्यातील अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतूक पूर्णतः रोखण्यासाठी प्रयत्नकरण्याचे आणि स्थानिक प्रशासकीय यंत्रणेने यासंदर्भात कठोर कारवाई करून अवैध उत्खननाला आळा घालावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 31, 2025   

PostImage

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आशा गटप्रवर्तकांचे विविध मागण्यांचे आमदार धर्मराव …


राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आशा गटप्रवर्तकांचे विविध मागण्यांचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांना निवेदन

 

अहेरी:-

महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक संघटनाच्या वतीने देशाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात अशा गटप्रवर्तक यांच्या विषयी भरघोस निधी उपलब्ध करून देण्यात याव्या अशा मागणीची निवेदन अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच आरोग्य मंत्री यांना पाठवलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या वतीने गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सदस्य तनुश्रीताई धर्मराव बाबा आत्राम यांनी हे निवेदन स्वीकारले. या निवेदनातून आशा गटप्रवर्तक यांना शासकीय कर्मचारी दर्जा द्यावा तसेच सामाजिक सुरक्षा लागू करावी पेन्शन योजना लागू करावी अशा विविध मागण्यांच्या समावेश करण्यात आला आहे.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 31, 2025   

PostImage

विधवा महिलेचा असाहयतेचा फायदा घेत ग्रामपंचायत ऑपरेटरने केला विनयभंग


 विधवा महिलेचा असाहयतेचा फायदा घेत ग्रामपंचायत ऑपरेटरने केला विनयभंग

मुल : चार महिन्यापूर्वी पतीचे निधन झाल्याने दोन मुलींसह राहत असलेल्या विधवा महिलेचा खुशाल पाल (३१) याने घरात घुसून विनयभंग केला. ही घटना बुधवारी (दि. २२) रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, आरोपी फरार आहे.

मूल पोलिस ठाणे अंतर्गत बेंबाळ दूरक्षेत्राच्या हद्दीतील फुटाणा येथील महिलेच्या पतीचे सप्टेंबर-२०२४ रोजी निधन झाले. त्यामुळे आपल्या मुलींसहमिळेल ती रोजी करून ती कुटुंबाचा गाडा हाकत आहे. पतीच्या मृत्यूनंतर मृत्यू दाखला व शासकीय योजनेच्या लाभासाठी कागदपत्राची जुळवाजुळव करण्यासाठी ग्रामपंचायतचा ऑपरेटर असलेला आरोपी खुशाल पाल याच्याकडे गेली. तेव्हा आरोपींनी महिलेचा मोबाइल नंबर घेऊन दाखले पाठवून देतो असे सांगितले.

बुधवारी रात्री महिला आपल्या घरी असताना आरोपी घरात घुसला. तिने आरडाओरडा केल्यानंतर आरोपीने पळ काढला. या घटनेनंतर तिने पोलिसात तक्रार दिली.

घटनेची तक्रार मूल पोलिसात दिल्यानंतर पोलिसांनी कलम ७४, ७५(२), ३३२ (क), ३५१ (२) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल केला. त्यानंतर आरोपीचा शोध सुरू केला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक वर्षा नैताम करीत आहेत


PostImage

Vaingangavarta19

Jan. 31, 2025   

PostImage

घराला कुलूप लावल्याचे पाहुण चोरट्यांनी केली १.७७ लाख रुपयांची रोकड …


घराला कुलूप लावल्याचे पाहुण चोरट्यांनी केली १.७७ लाख रुपयांची रोकड लंपास 

भद्रावती:-
सरस्वती नगर येथील एका घराला कुलूप लावल्याचे पाहुण अज्ञात चोरट्यांनी १ लाख ७७ हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची २९ जानेवारी रोजी घरमालक घरी पोहोचल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे 

माहितीनुसार, रंगनाथ स्वामी पतसंस्थेचे एजंट संतोष देविदास उंबरकर (५७) हे पत्नी चंदा, मुलगा रोशन आणि सून वैदेही यांच्यासह राहतात. २८ जानेवारी रोजी त्यांच्या सुनेला प्रसूतीसाठी चंद्रपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. संतोष उंबरकर यांची पत्नी आणि मुलगा त्यांच्या सोबत होते. सायंकाळी संतोष शहरातील पतसंस्थेसाठी पैसे गोळा करत असताना ६.३० वाजता त्यांची पत्नी चंदा हिने फोन करून आपला नातू अशक्त असल्याचे सांगितले. त्यामुळे त्याला बालरोगतज्ञांकडे दाखल करावे लागेल. हे ऐकून त्यांनी वसुलीची रक्कम घराच्या हॉलमध्ये ठेवलेल्या लाकडी कपाटात ठेवली. त्यांनी पत्नीला चंद्रपूर येथील रुग्णालयात पोहोचवून अर्भकाला (नातू) बालरोगतज्ञांकडे दाखल केले आणि चंद्रपुरात त्यांच्या सोबत रात्रभर मुक्काम केला. २९ जानेवारी रोजी ते भद्रावती येथील घरी परतले असता त्यांना त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. आत गेल्यावर कपाटात कपडे इकडे तिकडे विखुरलेले दिसले असता कलेक्शनमधील पैसे गायब असल्याचे दिसले. त्यावरून तो चोरीला गेल्याचे समोर आले. त्यामुळे त्यांनी तत्काळ भद्रावती पोलीस ठाणे गाठून चोरीची तक्रार दाखल केली. या आधारे भद्रावती पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ३०५ (अ), ३३१ (४) अन्वये गुन्हा दाखल केला आहे


PostImage

Vaingangavarta19

Jan. 31, 2025   

PostImage

शिक्षिकेच्या अपघातास कारणीभूत पोलीस अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करा


शिक्षिकेच्या अपघातास कारणीभूत पोलीस अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करा

विविध सामाजिक संघटनांच्या वतीने जिल्हा प्रशासनाकडे मागणी

गडचिरोली : प्रजासत्ताक दिनी पोलीस प्रशासनाद्वारे प्रतिबंधात्मक कारवाईसाठी जिल्हा परिषद कार्यालय गडचिरोली येथे उपस्थित राहण्याची नोटीस बजाविल्याने गोंधळलेल्या पोलिस जवानासोबत दाबंरंचा कडून गडचिरोलीला जात  असताना झालेल्या अपघातात दामरंचा जि. प. शाळेतील शिक्षिका पौर्णिमा कुकुकडर गंभीर जखमी झाल्या. अपघातास कारणीभूत ठरलेल्या संबंधित बेजबबादार अधिकाऱ्याविरोधात कडक कारवाई करून गंभीर जखमी शिक्षिकेच्या औषधोपचाराचा संपूर्ण खर्च पोलीस प्रशासनाने करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संविधान फॉउंडेशन, अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष, स्वतंत्र मजदूर युनियन व भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनास निवेदनातून दिला आहे.
अहेरी तालुक्यातील दामरंचा जि. प. शाळेतील मुख्याध्यापक नियमित शाळेत येत नसल्याने सहाय्यक शिक्षिका पौर्णिमा कुकुडकर यांच्याकडे मुख्याध्यापकाचा प्रभार देण्यात आला होता. दरम्यान संजय चांदेकर यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूपश्चात पत्नी कविता संजय चांदेकर यांनी शिक्षण विभागाकडे त्यांना मिळणाऱ्या देय रक्कमेत तत्कालीन गटशिक्षणाधिकारी निर्मला वैद्य व लिपिक मृणाल मेश्राम यांनी अफरातफर केल्याचा आरोप करीत त्यांचविरुद्ध कारवाई करावी असे पत्र जिल्हा परिषद प्रशासनाला दिले. यावर काहीच कारवाई न झाल्याने चांदेकर यांनी प्रजासत्ताक दिनी जिल्हा परिषद गडचिरोलीचे प्रांगणात दोन मुलांसह आत्मदहन करण्याचे पत्र जिल्हा परिषद प्रशासन व पोलीस विभागाला दिले होते. या पत्राचा संदर्भ देत प्रभारी अधिकारी उपपोलिस ठाणे दामरंचा यांनी शिक्षिका पौर्णिमा कुकुडकर यांना प्रजासत्ताक दिनी जिल्हा परिषद गडचिरोली येथे प्रतिबंधात्मक कारवाईसाठी उपस्थित राहण्याची नोटीस बजाविली. सदर नोटीस प्रजासत्ताक दिनाच्या दिवसापूर्वी मिळाल्याने शिक्षिका कुकूडकर गोंधळून गेल्या. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमास उपस्थित राहणे आवश्यक असताना पोलीस प्रशासन दामरंचा यांनी एका पोलिसासह रात्रोच्या सुमारास दुचाकीने गडचिरोलीला पाठविले. दरम्यान चामोर्शीपासून काही अंतरावर एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिल्याचे दुचाकी चालक पोलिस सांगत असले तरीही दुसऱ्या दुचाकीने मागे जबरदस्त धडक दिली असेल तर धडक देनाऱ्या दुचाकीस्वार याला कहीच मार लागला नाही असे होऊ शकते काय? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.पोलिस जवानासह शिक्षका पौर्णिमा कुकुडकर हे दुचाकीवरून कोसळून यांचा अपघात झाला. त्यामुळे या प्रकरणी दोषी पोलिस अधिकाऱ्यावर कडक कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा संविधान फॉउंडेशन गडचिरोली, अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष, स्वतंत्र मजदूर युनियन, भारतीय बौद्ध महासभा आदी पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदनातून दिला आहे.यासंदर्भात जिल्हाधिकारी, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांचेशी पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Jan. 31, 2025   

PostImage

मालेवाडा येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष शिबिराचे उद्घाटन आमदार रामदास …


 

दिनांक,३०/०१/२०२५

📍तालुका,कुरखेडा

 

एजाज पठाण प्रतिनिधि 

कुरखेडा तालुक्यातील मौजा कसारी येथे ॲड. विठ्ठलराव बनपूरकर मेमोरियल कला व वाणिज्य महाविद्यालय, मालेवाडा यांच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजनेच्या (NSS) महाविद्यालय स्तरीय सात दिवसीय विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले*. या शिबिराच्या उद्घाटन *आमदार रामदास मसराम सर* यांच्या हस्ते करण्यात आले.

 

या शिबिरात महाविद्यालयातील NSS स्वयंसेवकांनी सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून विविध उपक्रम राबवले. यामध्ये स्वच्छता मोहीम, आरोग्य तपासणी शिबिर, वृक्षारोपण, ग्रामसाफाई आणि जनजागृती* कार्यक्रमांचा समावेश होणार आहे .

 

उद्घाटन प्रसंगी आमदार रामदास मसराम सर* यांनी युवकांनी समाजासाठी योगदान देण्याच्या संधीचा उपयोग करावा असे मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी शिक्षणासोबत सामाजिक कार्याचा अनुभव जीवन घडवण्यास मदत करतो, असेही सांगितले.

 

या कार्यक्रमाला संस्थे चे अध्यक्ष रेखाताई बनपुरकर तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. कांबळी सर, विशेष अतिथी प्रा. डॉ. खालसा सर व महाविद्यालयाचे प्राध्यापक, NSS कार्यक्रम अधिकारी तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्वांनी आयोजकांचे अभिनंदन केले.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 31, 2025   

PostImage

अवैध रेती तस्करांनी तलाठ्याच्या अंगावर ट्रॅक्टर चढविण्याचा केला प्रयत्न, तलाठी …


अवैध रेती तस्करांनी तलाठ्याच्या अंगावर ट्रॅक्टर चढविण्याचा केला प्रयत्न, तलाठी बालबाल बचावले 

 


भद्रावती:-
 सर्वसामान्य नागरिकांची कामे जलद गतीने व्हावी, यासाठी राज्य शासनाने सर्व विभागांना 100 दिवसांच्या कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सुचना दिल्या आहेत. तसेच अधिका-यांनासुध्दा फिल्ड व्हीजीट करून नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेण्याबाबत निर्देश दिले आहेत.

याबाबत अधिकारी वर्ग प्रत्येक गावाना भेटी देत नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहे. तर एकीकडे भद्रावती तालुक्यातील शेगाव येथे तलाठी अनंत गीते वाळू तस्करांवर कारवाई करण्यासाठी गेले असता त्यांच्या अंगावर ट्रॅक्टर चढविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली आहे. याबाबत शेगाव पोलीस स्टेशनमध्ये तलाठी गीते यांनी तक्रार दिली आहे.महसूल उत्पन्न वाढीत क्रमांक एक वर असलेल्या जिल्ह्यात सध्या वाळू तस्करांचा मोठ्या प्रमाणात हैदोस सुरू आहे, प्रशासनातील अधिकाऱ्यांसमवेत आर्थिक हित जोपासत हा व्यवसाय सध्या चांगला सुरू आहे.

 30 जानेवारीला सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास कारेगाव येथे तलाठी अनंत गीते व सहायक कोतवाल संजय लभाने व नितीन बुरचुंडे रेतीने भरलेला ट्रॅक्टर अडवीत परवाण्याबाबत विचारपूस केली, परवाना नसल्याने सदर ट्रॅक्टर हा भद्रावती तहसील कार्यालयात जमा करण्यास सांगितले असता 2 अज्ञात व्यक्तींनी ट्रॅक्टर चालकाला तलाठ्यांच्या अंगावर वाहन चालविण्यास सांगितले. 

चालकाने वाहन तलाठ्यांच्या अंगावर चढविण्याचा प्रयत्न केला, तलाठी गीते वाहनसमोरून न हटल्याने त्या 2 व्यक्तींनी तलाठी गीते सोबत धक्काबुक्की करीत त्यांना बाजूला सारले. त्यांनतर ट्रॅक्टर चालकाने वाहनसहित तिथून पळ काढला.या सर्व प्रकाराची माहिती गीते यांनी तहसीलदार राजेश भांडारकर यांना दिली, ट्रॅक्टर चालक व त्या दोन इस्माविरुद्ध गीते यांनी शेगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. या घटनेचा पटवारी संघाचे विभागीय अध्यक्ष राजूरकर यांनी निषेध करीत आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे


PostImage

Vaingangavarta19

Jan. 30, 2025   

PostImage

पिएचसी चौकातील अतिक्रमण हटाव मोहिम अधीक तीव्र करणार-सरपंच रेखाताई पिसे


पिएचसी चौकातील अतिक्रमण हटाव मोहिम अधीक तीव्र करणार-सरपंच रेखाताई पिसे

 

नेरी (दि. ३० जानेवारी):- चिमुर तालुक्यातील नेरी येथील पिएचसी चौकातील अतिक्रमण हटाव मोहीमची प्रभावीपणे अंमलबजावणी करत राबविण्यात आली असुन अतिक्रमण हटाव मोहिम अधीक तिव्र करण्यात येणार आहे.गावाचा विकास करण्यासाठी ग्राम कमेटी मागे हटणार नाही, एक पाऊल पुढे टाकीत ग्रामपंचायतने अनेक विकासाची कामे केली आहेत. ७० हजार वर्षांपूर्वीपासून येथील स्मशानभूमीवरील अतिक्रमण हटविण्यात नेरी ग्रामपंचायतला यश मिळविले आहे तसेच घोडाझरी धरनातुन गावकऱ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळणार आहे. ही योजना ग्रामपंचायतने आणली आहे, जल जिवन मिशन अंतर्गत युद्ध स्तरावर काम सुरू आहे. असे अनेक विकासात्मक कामे नेरी ग्रामपंचायत ने हाती घेतले आहेसरपंच रेखा पिसे पुढे म्हणाल्या, गावातील अनेकांनी दुकानदारांनी त्यांना निर्धारित केलेल्या जागे व्यतीरिक्त सिमा निर्धारित केलेल्या असुन मर्यादित जागेवर धंदा करावा, पुढे पुढे सरकु नये व रस्ते वाहतुकीस मोकडे असावेत वाहतुकीस अडथळे निर्माण होईल असे क्रुत्य करु नये. अन्यथा अतिक्रमण हटविताना कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा ग्रामपंचायत कमेटीने दिला आहे. शासनाच्या अधिनस्त राहुन शासकीय जमिनीवरील अतिक्रमण हटाविण्यात येत असुन गावाचा विकास व्हावा, विकासाच्या शासकीय योजना राबविण्याचा नेरी ग्रामपंचायत प्रयत्न करत असतांनाच या अतिक्रमणाचा सामना करावा लागतो. अनेक शासनाच्या योजना राबवताना अतिक्रमण केलेले आड येत असते, विकास कामाला खिड बसते, परिणामी गावकऱ्यांनाही ग्राम विकासाचा फटका बसतो. शासनाच्या वतीने महाराष्ट्र भर अतिक्रमण हटाव मोहिम तिव्र करण्यात आली आहे.अतिक्रमण निर्मूलन करतांना गावकऱ्यांच्या तोंडुन ग्रामपंचायतची स्तुती करताना दिसुन येत आहे. अतिक्रमण हटविताना ज्यांना स्वतःच्या मालकीची घरे आहेत, त्यांनी घरी जावे ग्रामपंचायतच्या शासकीय कामात अडथळे आनु नये. अतिक्रमण हटाव मोहिमेत राजकीय रंग देवु नये, "आपला गाव-आपला विकास, "आपली माती आपली नाती" असे समजून गावकऱ्यांनी सहकार्य करावे असे आवाहन नेरी ग्रामपंचायत सरपंच रेखाताई पिसे यांनी केले आहे.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 30, 2025   

PostImage

अवघ्या २४ तासात उभारले नेलगुंडा येथे नवीन पोलीस स्टेशन


 अवघ्या २४ तासात उभारले नेलगुंडा येथे नवीन पोलीस स्टेशन

 

 

गडचिरोली:-
1000 सी–60 कमांडो, 25 बीडीडीएस टीम, नवनियुक्त पोलीस जवान, 500 विशेष पोलीस अधिकारी व खाजगी कंत्राटदार यांच्या मदतीने 24 तासात नेलगुंडा येथे नवीन पोलीस स्टेशन उभारण्यात आले आहे 
विशेष पोलीस महानिरिक्षक (नक्षलविरोधी अभियान)  संदिप पाटील, पोलीस उपमहानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र  अंकित गोयल, पोलीस अधीक्षक. नीलोत्पल, 113 बटा. सिआरपीएफचे कमांडण्ट  जसवीर सिंग, 09 बटा. चे कमांडण्ट  शंभु कुमार, 37 बटा. चे कमांडण्ट  दाओ इंजीरकान कींडो व ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडले

 
मागील वर्षी 14 जून रोजी नेलगुंडा गावातील ग्रामस्थांनी माओवाद्यांना गावबंदी केली होती.

नवीन पोलीस स्टेशनची स्थापना या भागाच्या सर्वांगीण विकासामध्ये महत्वाची भूमिका बजावेल पोलीस अधीक्षक  नीलोत्पल
माओवाददृष्ट अतिसंवेदनशील गडचिरोली जिल्हा, दुर्गम-अतिदुर्गम भाग असलेला ज्या ठिकाणी बरेच आदिवासी बांधव आज देखील विकासापासून कोसो दूर आहेत, त्यांचा विकास साधावा व माओवाद्यांच्या कारवायांना आळा बसावा यासाठी गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने आज दिनांक 30/01/2025 रोजी उपविभाग भामरागड अंतर्गत नेलगुंडा या ठिकाणी नवीन पोलीस स्टेशनची स्थापना करण्यात आली. सन 2024 या वर्षाअखेर दिनांक 11/12/2024 रोजी याच भागात अतिदुर्गम पेनगुंडा येथे नवीन पोलीस मदत केंद्राची स्थापना करण्यात आली होती. भामरागड पासून 20 किमी., धोडराज पासुन 14 किमी., पोमकें पेनगुंडा पासुन 04 कि.मी. व छत्तीसगड सिमेपासुन फक्त 600 मीटर अंतरावर असलेल्या अति-दुर्गम नेलगुंडा व आसपासच्या गावातील नागरिकांच्या सुरक्षा व सर्वांगीण विकासाला हातभार लागून त्यांनी विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्याकरीता पोलीस स्टेशन नेलगुंडा मैलाचा दगड ठरेल.

सदर पोलीस स्टेशनची उभारणी करण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. त्यात एकुण 1050 मनुष्यबळ, 10 जेसीबी, 19 ट्रेलर, 04 पोकलेन, 45 ट्रक इत्यादीच्या सहाय्याने अवघ्या एका दिवसांत पोलीस स्टेशनची उभारणी करण्यात आली. सदर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस बलाच्या सुविधेसाठी वायफाय सुविधा, 19 पोर्टा कॅबिन, जनरेटर शेड, पिण्याच्या पाण्यासाठी आर ओ प्लँट, मोबाईल टॉवर, टॉयलेट सुविधा, पोस्ट सुरक्षेसाठी मॅक वॉल, बी.पी मोर्चा, 08 सँन्ड मोर्चा इत्यादींची उभारणी करण्यात येत असून यासोबतच पोलीस स्टेशनच्या सुरक्षेसाठी गडचिरोली पोलीस दलाचे 04 अधिकारी व 49 अंमलदार, एसआरपीएफ ग्रुप 10, सोलापूरचे 02 प्लाटुन तसेच सिआरपीएफ 113 बटा. डी कंपणीचे 01 असिस्टंट कमांडन्ट व 69 अंमलदार, विशेष अभियान पथकाचे 06 पथक (150 कमांडोज) तैनात करण्यात आले आहेत. तसेच पोस्टे उभारणी कार्यक्रमादरम्यान पोलीस स्टेशन नेलगुंडा हद्दीतील उपस्थित नागरिकांपैकी महिलांना नववारी साडी, पुरुषांना घमेले, ताडपत्री, स्प्रे-पंप, युवकांना लोअर पॅन्ट, टि-शर्ट, चप्पल, ब्लॅकेट, नोटबुक, पेन, स्कुल बॅग, फ्रॉक, चॉकलेट, बिस्कीट, मुलांना क्रिकेट बॅट, बॉल, व्हॉलीबॉल नेट, व्हॉलीबॉल इत्यादी विविध साहित्यांचे वाटप करण्यात आले. अतिदुर्गम भागात नवीन पोलीस स्टेशनच्या उभारणीमुळे तेथील नागरिकांनी संतोष व्यक्त करुन पोलीस प्रशासनाप्रती आभार व्यक्त केले.

सदर नवीन पोलीस स्टेशन उभारणीच्या कार्यक्रमाप्रसंगी विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान)  संदिप पाटील, पोलीस उपमहानिरिक्षक गडचिरोली परिक्षेत्र  अंकित गोयल, पोलीस उपमहानिरिक्षक, केंद्रीय राखीव पोलीस बल, गडचिरोली  अजय कुमार शर्मा, गडचिरोली जिल्ह्राचे पोलीस अधीक्षक. नीलोत्पल, कमांडण्ट 113 बटा. केंद्रीय राखीव पोलीस बल  जसवीर सिंग, कमांडण्ट 09 बटा. केंद्रीय राखीव पोलीस बल  शंभु कुमार, कमांडण्ट 37 बटा. केंद्रीय राखीव पोलीस बल  दाओ इंजीरकान कींडो, अपर पोलीस अधीक्षक (अभियान)  यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक, अहेरी डॉ. श्रेणिक लोढा, उपविभागीय पोलीस अधिकारी, भामरागड  अमर मोहिते व पोलीस स्टेशन नेलगुंडाचे नवनियुक्त प्रभारी अधिकारी पोउपनि. अमोल सोळुंके, इतर अधिकारी व पोलीस अंमलदार उपस्थित होते.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 30, 2025   

PostImage

सुट्या पैशांवरून एसटी बसच्या वाहकाला केली मारहाण


सुट्या पैशांवरून एसटी बसच्या वाहकाला केली मारहाण


अमरावती : एसटी बसमध्ये प्रवासादरम्यान सुटे पैसेबाबत झालेल्या वादातून बसच्या वाहकाला मारहाण झाल्याची धक्कादायक माहिती आहे. ही घटना अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर आगारातील नांदेड बुद्रुक या मार्गावर घडली. एसटीच्या नव्या भाडेवाढीमुळे प्रवाशी व वाहक यांच्यात झालेल्या सुट्या पैशांवरून दररोज बाचाबाची होत असून अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर आगारातील नांदेड बुद्रुक या मार्गावर कामगिरी बजावणाऱ्या वाहकाला मारहाण झाल्याचा गुन्हा पोलिसात दाखल करण्यात आला आहे.

भाडेवाढ झाल्यानंतर पाच दिवसात अनेक ठिकाणी बाचाबाची झाल्याच्या घटना सोशल मीडियावर फिरत असून यातून पुढे काही अनर्थ घडू नये यासाठी खबरदारी म्हणून भाडेवाढ सूत्रात तात्काळ बदल होण्यासाठी एसटीकडून पुन्हा एकदा राज्य परिवहन प्राधिकरणाकडे फेरप्रस्ताव सादर करण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे.नवीन भाडेवाढ ही पाच रुपयांच्या पटीत असावी असा स्पष्ट प्रस्ताव एसटीने या पूर्वीच पाठवला असताना त्याला प्राधिकरणातील अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवली व आर्थिक नुकसान होण्याचे कारण देत अनपेक्षितपणे बदल करून एक रुपयाच्या पटीत भाडेवाढ करण्याचा आदेश काढला असून सध्या चलनात सुट्या पैशाचे व्यवहार जवळ जवळ बंद झाले आहेत.ए.टी. एम. मधून सुद्धा शंभर, दोनशे व पाचशे रुपयांच्या नोटा निधत असल्याने कोणताही प्रवाशी सुटे पैसे मागितल्यावर देत नाही. तरीही भाडेवाढ करतांना प्राधिकरणाकडून एक रुपयाच्या पटीत भाडेवाढ केली गेली व एसटीला तोटा होण्याची भीती दाखऊन अनपेक्षितपणे प्राधिकरणाकडून हा निर्णय लादला गेला असल्याची टीकाही बरगे यांनी केली आहे. या घटनेनंतर एसटी प्रशासन या घटना टाळण्यासाठी काय उपाय करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

एसटी प्रशासनाने पुन्हा पत्र द्यावे
भाडेवाढीवर निर्णय घेण्याचे अधिकार राज्य परिवहन प्राधिकरणाला आहे. १६ जून २०१८ रोजी व २६ ऑक्टोंबर २०२१ रोजी जी भाडेवाढ करण्यात आली आहे. ती पाचच्या पटीत करण्यात आली असून त्याच सूत्रानुसार भाडेवाढ पाचच्या पटीत करण्यासाठी प्राधिकरणातील अधिकाऱ्यांना सांगायला हवे.सुट्या पैशाची अडचण येत असल्याचे पुरावे देऊन त्याच प्रमाणे वाहकांकडून आलेल्या तक्रारी व पोलिसात दाखल झालेले गुन्हे याचे पुरावे सादर करून पुन्हा एकदा प्रस्ताव एसटीकडून पाठवला जावा असेही बरगे यांनी म्हटले आहे.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 30, 2025   

PostImage

गडचिरोलीत लोह आधारित पूरक उद्योगांना मोठा वाव – जिल्हाधिकारी अविश्यांत …


गडचिरोलीत लोह आधारित पूरक उद्योगांना मोठा वाव – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा

 

गडचिरोली : जिल्ह्यातील लोह उद्योगात वाढ होत असल्याने येत्या काळात लोह उत्पादनावर आधारित पूरक उद्योगांना मोठी संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात अधिकाधिक लोह आधारित पूरक उद्योग निर्मितीसाठी उद्योग मित्रांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले.

जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने आयोजित जिल्हा उद्योग मित्र, जिल्हा सल्लागार समन्वय समिती, जिल्हा आजारी उद्योग पुनर्वसन समिती आणि जिल्हा स्थानिक लोकांना रोजगार सनियंत्रण समितीच्या संयुक्त सभेत ते बोलत होते.

जिल्ह्यातील सुशिक्षित युवकांना कौशल्य प्रशिक्षण मिळावे यासाठी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत कंपन्यांनी पोर्टलवर नोंदणी करावी, तसेच जिल्हा कौशल्य विकास कार्यालयाने युवकांना अधिकाधिक प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

सभेत उद्योजकांच्या अडचणी, औद्योगिक क्षेत्रात पायाभूत सुविधा, स्थानिकांना रोजगाराच्या संधी आणि उद्योग केंद्राच्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निलेश गायकवाड, जिल्हा कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेंद्र शेंडे यांसह जिल्हा उद्योग केंद्र,  जिल्हा अग्रणी बँक, नाबार्ड, खादी ग्रामोद्योग, नगररचना, विज महावितरण कंपनी, एम.आय.डी.सी., कामगार विभाग, खनिकर्म विभाग इत्यादी विभागांचे प्रतिनिधी आणि गडचिरोली जिल्हयातील उद्योग संघटना आणि इतर उद्योजक हजर होते.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 30, 2025   

PostImage

मराठीचा अभिमान प्रत्येकाने बाळगावा- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश


मराठीचा अभिमान प्रत्येकाने बाळगावा- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश

 

जिल्हा न्यायालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा 

 

गडचिरोली, दि.३० – मराठी भाषा ही संत ज्ञानेश्वर, तुकाराम आणि समर्थ रामदास यांची भाषा असून तिचा अभिमान प्रत्येकाने बाळगावा, असे प्रतिपादन गडचिरोली जिल्हा न्यायालयात आयोजित "मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा" निमित्त प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वसंत भा. कुलकर्णी यांनी केले.
गडचिरोली जिल्हा न्यायालयाच्या कक्ष क्रमांक ३०६ मध्ये दिनांक २७ जानेवारी २०२५ रोजी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. न्या. कुलकर्णी यांनी अध्यक्षस्थान भूषविले, तर गोंडवाना विद्यापीठातील मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. निलकंठ पंढरी नरवाडे हे प्रमुख पाहुणे व मुख्य वक्ते म्हणून उपस्थित होते. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर.आर. पाटील यांचीही विशेष उपस्थिती होती.
कार्यक्रमात मुख्य न्यायिक दंडाधिकारी एस.पी. सदाफळे, दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर), सी.पी. रघुवंशी, सह-दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) श्री. भैसारे आणि इतर न्यायाधीश मंडळींनी आपली उपस्थिती दर्शवली.
कार्यक्रमाचे संचालन सह-दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) श्रीमती पठाण यांनी केले. प्रा. डॉ. नरवाडे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात मराठी भाषेचे न्यायालयीन कामकाजातील महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी प्रत्येक मराठी भाषिकाने आपल्या भाषेचा अभिमान बाळगण्याचे आवाहन केले.
यावेळी न्या. कुलकर्णी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मराठी भाषा समृद्ध, श्रेष्ठ आणि अभिजात असल्याचे स्पष्ट करत पु. ल. देशपांडे, वि. वा. शिरवाडकर, संत ज्ञानेश्वर व तुकाराम यांच्या कार्याचा उल्लेख केला. मराठी भाषा लोप पावण्याची भीती दूर करण्यासाठी तिचा रोजच्या जीवनात अधिकाधिक वापर व्हावा, असे त्यांनी आवर्जून सांगितले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अधिक्षक एस.जे. शेंडे यांनी परिश्रम घेतले. सह-दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) श्री. भैसारे यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमाला न्यायालयीन कर्मचारी तसेच वकील मोठ्या प्रमाणावर उपस्थित होती.


PostImage

MH 33 NEWS

Jan. 30, 2025   

PostImage

डॉक्टर नाही तर मोहल्ला क्लीनिक कशाला? - आजाद समाज पार्टी …


 

गडचिरोली : येथील फुले वार्डात नागरिकांच्या तक्रारी वरून आजाद समाज पार्टीने वॉर्डातील आयुष्यमान आरोग्य केंद्राला भेट दिली असता गेल्या 15 -20 दिवसापासून दवाखान्यात डॉक्टरच उपलब्ध नसल्याची माहिती उघडकीस आली. शहरातील इतर वार्डातील माहिती घेतली असता बरेचदा डॉक्टर च उपस्थित राहत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे जर डॉक्टर आणि कर्मचारीच नाही तर शासनाने मोहल्ल्यात दवाखाना कशासाठी उघडला असा सवाल उपस्थित केला. शहरातील गोर, गरीब, मजूर, कामगार लोकांना तातडीने मोफत उपचार घेता यावा या करीता असे हॉस्पिटल शासनाने वार्डा वार्डात सुरु केले पण कर्मचाऱ्यांची अभावी ही दवाखाने ओस पडल्याचे चित्र शहरात आहे.

जिल्ह्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे असल्याने आरोग्य विभागात मोठी अडचण निर्माण झाली आहे. एकाच डॉक्टर ला 2 ते 3 दवाखान्यात जावे लागते. त्यामुळे नागरिकांना व वैद्यकीय अधिकाऱ्यांना सुद्धा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.  लवकरच आजाद समाज पार्टी च्या वतीने जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याकडे या संदर्भात मागणी करण्यात येईल असे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी सांगितले. दवाखान्यात भेटी दरम्यान जिल्हा कोषाध्यक्ष नागसेन खोब्रागडे, मिडीया प्रभारी सतीश दुर्गमवार,, आशिष गेडाम, गडचिरोली शहर सचिव कैलास रामटेके उपस्थित होते.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 30, 2025   

PostImage

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजीत पवार)विविध पार्टीचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी …


राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजीत पवार)विविध पार्टीचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केला पक्ष प्रवेश

 

 माजी मंत्री तथा विद्यमान आमदार डाॅ.धर्मरावबाबा आत्राम यांची उपस्थिती

गड़चिरोली:-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून माजी कॅबिनेट मंत्री तथा आमदार डा.धर्मरावबाबा आत्राम यांच्या प्रमुख उपस्थितिमध्ये अमोल कुळमेथे यांच्या नेतृत्वात शरदचंद्र पवार पक्षाचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सोमवार, 27 जानेवारीला राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्यालय गड़चिरोली येथे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पार्टीमध्ये पक्ष प्रवेश केला. पक्ष प्रवेश करतांना अमोल कुळमेथे यांनी म्हटले की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची कार्यप्रणाली आणि गडचिरोली जिल्ह्यात आमदार डाॅ.धर्मरावबाबा आत्राम यांनी अनेक विकासकार्य केलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून डाॅ.धर्मरावबाबा आत्राम यांची जनमानसात एक वेगळीच ओळख निर्माण झाली आहे. डाॅ.धर्मरावबाबा आत्राम यांच्यामध्ये समाजातील मागास घटकांपर्यत पोहचून विकास घडवून आणण्याची क्षमता असल्यामुळे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी पक्ष प्रवेश केलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केल्यामुळे नक्कीच जिल्ह्याचा विकास करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असू, असे मत अमोल कुळमेथे यांनी व्यक्त केले. पक्ष प्रवेश करतांना माझी नगरसेवक खूमेश कुळमेथे, शरदचंद्र पवार गटाचे जिल्हा युवक उपाध्यक्ष प्रसाद पवार, महिला जिल्हा सरचिटणीस सुषमाताई येवले, महिला शहराध्यक्ष प्रीती कोवे, युवक शहराध्यक्ष अजय कुकडकर, जेष्ठ नेत्या उमा बन्सोड, चामोर्शी निरीक्षक आरती कोल्हे, महिला शहर उपाध्यक्ष नईमा हुसैन, महिला शहर सरचिटणीस मीना मावळनकर, आशा मुळेवार,  सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक संघरक्षित फुलझेले, सेवानिवृत्त मुख्याध्यापक पुरुषोत्तम कुळमेथे, सेवानिवृत्त वनपाल बळवंत येवले, माजी जिल्हा परिषद कर्मचारी प्रदीप वडेट्टीवार, खुशाल तरोने, संजय भोयर, साहित्यिक व आंबेडकरवादी विचारवंत सतीश कुसराम, अजय कोवे, धनु गेडाम, रुपेश गेडाम, रुपेश सलामे, रेणू कुळमेथे, अंजू कुळमेथे, किरण मंगरे, कविता चिचघरे, तेजस लाकडे, सुरेश चिकराम, स्वप्निल येडलावार, रोशनी पुडो, विक्की केळझरकर, मयूर सूर्यवंशी, डिंपल सहारे, आबिद शेख, मोना बोरकर, सोनू कुळमेथे, सोनाली राईंचवार, अस्मिता खोब्रागडे, महेश निमगडे आदी शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पार्टीमध्ये पक्ष प्रवेश केला. यावेळी सिनेट सदस्य तनुश्री आत्राम, माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धन आत्राम, जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर, प्रदेश उपाध्यक्ष नाना नाकाडे, प्रदेश महासचिव युनूस शेख, युवक राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष लीलाधर भरडकर, जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, तालुकाध्यक्ष व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.